spot_img
spot_img

इमानदारी संपलीय! लाचखोरीत महसूल विभागाची आघाडी! – राजकीय अभयामुळे हिमंत वाढली?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘लक्ष्मी भेट’ स्वीकारण्याची सवय अंगवळणी पडल्याने लाचखोरी वाढली आहे.शिवाय त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने मावळत्या वर्षात लाचखोरी मध्ये महसूल विभाग पुढे आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकुण 16 जणांवर कारवाई केलीय, मात्र त्यांना योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सरकारी पगार असतानाही लोकसेवक सामान्य लोकांकडून लाच स्वरूपात पैसे घेतात. याच्या तक्रारी प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून कारवाया केल्या जातात. डिसेंबर 23 ते 24 नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात 16 कारवाया करण्यात आल्या आहेत. यात लाच घेण्यात महसूल विभाग पहिल्या स्थानावर असून,नगर प्रशासन व सामान्य रुग्णालय यांचा क्रम लागतो. इमानदारी संपली का? सरकारी पगार पुरेना, अशीच परिस्थिती जिल्ह्यात आहे.

लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी काही अधिकारी, कर्मचारी सामान्यांची नियमात असणारी कामे अडवतात. त्यांच्याकडून अगदी 3000 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत लाचेची मागणी करतात; परंतु काही सुजाण नागरिक या लाचखोर लोकसेवकांची ‘एसीबी’कडे तक्रार करतात. येथील पथक सर्व शहानिशा करते. त्यानंतर मग पडताळणी करून सापळा लावतात आणि लाच घेताच त्याला पकडतात. या चालू वर्षात ‘एसीबी’ने 16 कारवाया करून मासे गळाला लावले आहेत.
ते खालील प्रमाणे पाहू शकता…

▪️यांच्यावर केली कारवाई!

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!