बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज 29 डिसेंबर शहरातील सर्कुलर रोडवरील एस टू के कापड दुकानासमोर आज रात्री भीषण अपघात झाला. एफ झेड कंपनीची रेसर बाईक (एमएच 28 बीएस 2145) आणि स्कुटी (एमएच 28 एटी 9594) यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका जोरदार होता की, परिसरातील लोकांचा आवाजाने थरकाप झाला. शिंदे आणि निकाळजे असे जखमींची नावे असून, त्यांची ओळख पटली आहे. अपघाताच्या तीव्रतेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेग आणि निष्काळजीपणा यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सर्कुलर रोडवरील ही घटना शहरातील वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना घडत असून, प्रशासनाला कठोर पावले उचलण्याची गरज आहे.