बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उद्या 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा होतोय.या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्यामुळे त्यांचा वाढदिवस म्हणून ख्रिश्चन धर्माचे लोक ख्रिसमस हा सण साजरा करतात. ख्रिसमसच्या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्ताची प्रार्थना करतात आणि घरातील ख्रिसमस ट्री सजवतात. या खास ख्रिस्त जन्माप्रसंगी कार्यक्रम किंवा उपक्रम साजरे करायचे असेल तर बांधवांनो ख्रिस्त जयंतीचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता,असे आवाहन रेव्ह सुहास गुर्जर व रेव्ह सुरेश पळसकर आदींनी केले आहे.
शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच सर्व चर्चमध्ये देशाच्या शांततेसाठी, आरोग्यासाठी यावेळी विशेष प्रार्थना,भक्ती, उपासना, गाण्यांचे तसेच विविध सामाजिक उपक्रमांचेही आय़ोजन करण्यात आले आहे.नाताळच्या पूर्वसंध्येला सर्वत्र झगमगाट आहे. शहरातील चर्च ऑफ दि नॅझजरीन आणि इतरही चर्चवर तसेच शहरातील दुकाने, इमारतीवर आकर्षक विद्यूत रोषणाई, सजावट करण्यात आली आहे.चर्च ऑफ दी नॅझरीन तर्फे ख्रिस्त जयंती आनंदात साजरी करावी,असे आवाहन रेव्ह सुहास गुर्जर व रेव्ह सुरेश पळसकर यांच्यासह प्रणील मेहंद्रे,सतीश खरे,आशुतोष,अंकुश,अनिल मेहंद्रे ,अशोक कांबळे,सुशील मेहेंद्रे,राजेश गुर्जर, डॉ.सालोमन गुर्जर,अभिजीत गुजर व पंचमंडळ सदस्यांनी केले आहे.