बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांच्यावर कामगार मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेया वाटपाबाबत नाराजगी आणि चर्चेचा सुर असतानाच 21 डिसेंबरच्या रात्री नऊ वाजता नवीन मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे.यामध्ये मुख्यमंत्री यांच्याकडे गृह खात ठेवण्यात आला आहे तर अजितदादांना त्यांचं अर्थ खात मिळालाय आहे.