spot_img
spot_img

भाकरी फिरवली नाही,करपली नाही तर हिसकावलीच! – ॲड.जयश्री शेळके म्हणाल्या.. ही तर राजकीय सूड भावना! – अतिक्रमणकर्त्यांना पर्यायी जागा द्या!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाणा व मोताळा शहरातील विविध भागात सुरु असलेली अतिक्रमण हटाओ मोहिमेला थांबवून व्यावसायिकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्यात यावा यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्या ॲड.जयश्री शेळके यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

बुलडाणा शहरातील मुख्य बाजारपेठेत मुबलक प्रमाणास मोकळ्या जागेचा अभाव आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये जवळपास मागील ४० वर्षांपासून गरजू व्यावसायिक अतिक्रमणच्या जागेवर आपला व्यवसाय करित आहेत. त्यांनी याठीकाणी शुन्यातून आपला व्यवसाय वाढीस लावला असून सद्यस्थ‍ित व्यवसायाचा चांगला जम बसला आहे. परंतु बुलडाणा शहरातील इकबाल चौक परिसर, कुंभार गल्ली, बाजारगल्ली, पोस्ट ऑफीस परिसर येथे प्रशासनाच्या वतीने अचानक अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मोताळा शहरातील आठवडी बाजार चौक आणि परिसरातील अतिक्रमणधारक व्यावसायिकांना प्रशासनाच्यावतीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व अतिक्रमण धारक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पर्यायी जागा उपलब्ध न करता त्यांचे व्यवसाय उठवून व्यावसायिकांच्या पोटाची भाकर हिसकावून घेऊ नका अशी मागणी ॲड.जयश्री शेळके यांनी प्रशासनाकडे केली आहे.

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी व्यवसाय करत असतांना अचानक प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही पिडीतांना तसेच नागरिकांना कोड्यात टाकणारी आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीतून सुडाच्या भावनेने ही कार्यवाही केली जात असल्याची चर्चा सद्या शहरात होत आहे. अतिक्रमण धारक व्यावसायिकांमध्ये अनेक व्यावसायिकांची परिस्थ‍िती हालाकीची आहे. काहींनी तर कर्ज भांडवलाची गुंतवणूक करुन नव्याने व्यवसाय सुरु केला आहे. या सर्व अतिक्रमणधारक व्यावसासिकांचा सहानुभूतीपुर्वक विचार होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे बुलडाणा व मोताळा शहरातील अतिक्रमणधारक व्यावसायिकांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन दिल्याशिवाय अतिक्रमण हटवू नये अशी मागणी ॲड.जयश्री शेळके यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. नझूलच्या जमिनीबाबत नगरपालिका कोणत्या आधारावर नोटीसा काढत आहेत अशी विचारणा करत मा.आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यावसायिकांकडे सहानुभूतीने पाहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष तुळशीराम काळे, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकास, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर, आशिषबाबा खरात, एकनाथ कोरडे, जाकिर कुरेशी, सत्तार कुरेशी, अब्दुल कुरेशी, राहुल जमादार, अनिकेत गवळी, मो.सोफियान, सलीम पठाण, सय्यद बिल्लाल डोंगरे, मो.सादिक, शेख इलीयात अमीर, मो.शाकीर, नवेद हुसेन, इकबाल अहेमद खान, शेख अकील, शेख करीम, शेख नूर मोहम्मद, शेख इब्रामान, नदीम शेख, शेख इकबाल कुरेशी, मो.जावेद मो.फारुख, शेख मोइन शेख सलीम, शेख अकसर शेख हैदर कुरेशी, शेख लाल शेख महेबूब, मो.जावेद, विजय राऊत, बाला राऊत, विनोद गवई, अविनाश जाधव, श्रीकांत जाधव, धनंजय बाहेकर, निलेश पाटील, स्मिता वराडे, सपना इंगळे, किर्ती परिहार, वंदना जवंजाळ, उदय देशमुख, संदीप बोर्डे इ.उपस्थ‍ित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!