मोताळा (हॅलो बुलडाणा) आजकाल रस्त्यावर सापडलेला 1 रुपया कुणी परत देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, तिथे विसरलेला मोबाईल परत देण्याचे तर सोडाच! पण बुलडाणा अर्बन शाखा मोताळा येथील खातेदार रत्नमाला थेरोकार यांनी विसरलेला मोबाईल शिपाई रविंद्र राठी यांनी परत केलाय.
मोताळा शाखेत व्यवहार करण्यासाठी रत्नमाला थेरोकार वडिलासोबत आल्या. व्यवहार झाल्यानंतर त्या निघून गेल्या मात्र त्या आपला सॅमसंग कंपनीचा मोबाईल शाखा कार्यालयात विसरून गेल्या. सदरचा मोबाईल शाखेचे शिपाई रविंद्र राठी यांना सापडला. त्यांनी लगेच शाखा व्यवस्थापक श्रीकृष्ण पाटील यांचेकडे स्वाधीन केला. याची माहिती मलकापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक आनंद चांडक यांना दिली. नंतर त्याच मोबाईल वर आलेला कॉल घेतला असता ओळख पटवून सदरचा मोबाईल रत्नमाला थेरोकार यांचा असल्याचे निष्पण झाले. त्यांच्या सांगण्यावरून त्यांचे वडिल तायडे यांना शाखा कार्यालयात बोलावून त्यांना शाखा व्यवस्थापक यांचे हस्ते परत करण्यात आला. या घटनेच्या निमित्ताने प्रामाणिपणा दाखवलेल्या बुलडाणा अर्बनच्या रविंद्र राठी याचे सर्वत्र कौतुक होत आहे.