बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘फिरू नको माघारी.. घे भरारी!’ अशा म्हणीचा प्रत्यय शिरीषजी देशपांडे यांच्याबद्दल आलाय. त्यांची देशव्यापी राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुखपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था “बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे” मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुणे येथील बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे अध्यक्ष मा श्री शिरीष देशपांडे यांची देशभरातील सहकारी पतसंस्थांच्या सहकार भारती राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.