spot_img
spot_img

BREAKING! सिंदखेडराजात भरदिवसा गौरक्षकाला मारहाण; बसस्थानकासमोरील घटना सोशल मीडियावर व्हायरल!

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) शहरात भरदिवसा बसस्थानकासमोर घडलेल्या मारहाणीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. गो शाळा सम्मान अभियान अंतर्गत महाराष्ट्र प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या गौरक्षकाने जनावरांची गाडी अडवल्याच्या कारणावरून काही जणांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गौरक्षकांनी जनावरांची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गाडी थांबवली. याच कारणावरून काही व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. भरदिवसा, सार्वजनिक ठिकाणी आणि बसस्थानकासमोर अशी घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गौरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून संबंधितांची ओळख पटवावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

व्हिडिओ

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!