spot_img
spot_img

आज बांगलादेशला धडा शिकवण्यासाठी बुलढाण्यात ‘आक्रोश!’ -हिंदू बांधवांनो बहुसंख्येने उपस्थित राहावे ! हिंदुराष्ट्र सेनाचे जिल्हाप्रमुख विजय पवार यांचे आवाहन!

चिखली (हॅलो बुलडाणा) बांगलादेश मध्ये हिंदू बांधवांवर अमानुष अत्याचार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निषेध नोंदविण्यासाठी बुलढाण्यात आज 10 डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून तमाम हिंदू बांधवांनी निषेध नोंदविण्यासाठी आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन,
हिंदुराष्ट्र सेनाचे जिल्हाप्रमुख विजय पवार यांनी केले आहे.

बांगलादेशमध्ये राजरोसपणे हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. खून,दरोडे, संपत्तीची लुटमार लहान मुलांच्या हत्या,स्त्रियांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बांगलादेश सरकार यावर कुठलाही निर्बंध आणताना दिसत नाही.या पार्श्वभूमीवर बांगलादेशला धडा शिकवण्यासाठी सकल हिंदूंनी एक होणे गरजेचे आहे. मागच्या वेळेस बांगलादेशच्या बांधवांसाठी जिल्हा बंदचे आवाहन केले होते व सकल हिंदूंनी ते यशस्वी केले. आता आक्रोश मोर्चा काढायचाच! हा मोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीने असून सर्व हिंदूंनी मोर्चात सहभाग नोंदवावा असे आवाहन हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख विजय पवार यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!