spot_img
spot_img

EXCLUSIVE! सुलतानपुरात पहाटे आगीचा महातांडव! दोन दुकाने बेचिराख; लाखोंची राखरांगोळी! ‘१०१’वर फोन लागेना, अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत होत्याचं नव्हतं! आग विझल्यानंतर दुसरी गाडी आली कशाला? संतप्त नागरिकांचा प्रशासनाला थेट सवाल!

सुलतानपूर (हॅलो बुलढाणा/मोईन खान) पहाटेची वेळ… सारे गाव साखरझोपेत… अन् अचानक आगीच्या ज्वाळांनी सुलतानपूर हादरले! लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे शनिवारी (१७ ऑक्टोबर) पहाटे चार ते पाच वाजेदरम्यान लागलेल्या भीषण आगीत दोन व्यावसायिकांची दुकाने जळून खाक झाली. मात्र या आगीपेक्षाही अग्निशमन यंत्रणेच्या कथित दिरंगाईने नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला आहे

अंबादास जुमडे यांच्या कपड्याच्या दुकानासह सतीश इंगळे यांच्या मोटर रिवाइंडिंगच्या दुकानाला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. दोन्ही दुकानांतील मालमत्ता भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

धक्कादायक म्हणजे, आग लागताच नागरिकांनी १०१ क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र फोनच लागला नसल्याचा आरोप आहे! सकाळी ५.१५ वाजेपासून सातत्याने संपर्क केल्यानंतर पहिली अग्निशमन गाडी तब्बल ६.३० वाजता पोहोचल्याचे नागरिक सांगतात.

त्यातच लोणारची दुसरी गाडी आग आटोक्यात आल्यानंतर पोहोचल्याने संतापाचा उद्रेक झाला! दोन कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार आगीत उद्ध्वस्त झाला. आता प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच विलंबाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!