बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘ऑटो चालक असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात तर मी पण काही नवीन करून दाखवू शकतो!’ हा आत्मविश्वास असल्याने बुलढाणा येथील ऑटो चालक शेख युनूस यांनी तब्बल 22 वर्ष ऑटो चालवून आता त्यांनी लहान मुलांच्या खेळणीच्या व्यवसायाला सुरुवात केली असून,या दुकानाचा शुभारंभ बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
“कोई भी धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता” हा शाहरुख खानच्या रईस सिनेमातील डायलॉग शेख युनुस या ऑटोचालकाने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलाय. तुमच्याकडे जर चांगली आयडिया असेल, तर तुम्ही तगडा पैसा कमवू शकता, हे युनूस यांनी दाखवून दिलं आहे. भलेही तुमच्याकडे पैसा कमी असो, जर तुमच्या आयडियाला रणनीतीची जोड दिली, तर यश तुमचंच! अशी यातून बेरोजगारांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.ही प्रेरणा अन्य युवकांनी घ्यावी, अशी मार्गदर्शक सूचना राधेश्याम चांडक यांनी दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे.