बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाजप शिंदे सरकार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे देशाने पाहिले आहे.सर्व सरकारी यंत्रणा मोदी सरकारच्या दावणीला बांधलेल्या आहेत. लोकशाही व संविधानासाठी हे घातक असून आता 20 नोव्हेंबरला परिवर्तन घडवून आणायचे आहे, असे प्रतिपादन बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री ताईं शेळके यांनी केले.
त्या मढ येथे गाव भेट दौऱ्यानिमित्त बोलत होत्या.केंद्र आणि राज्यातील सरकारची धोरणे लोकशाहीला मारक ठरत असून संविधान धोक्यात आले आहे. आता महाविकास आघाडीचे हात मजबूत करावे व ताकदीने परिवर्तन घडविण्यासाठी मतरूपी आशीर्वाद द्यावे, असेही जयश्रीताई शेळके त्यांनी आवाहन केले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनील शेळके यांनी मढ येथे गावभेट दौरा केला.गावकऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात औक्षण करून स्वागत केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमूख जालिंदरभाऊ बुधवत, गणेशसिंह भाऊ राजपूत विधानसभा अध्यक्ष बुलढाणा मोताळा, लखन गाडेकर तालुकाप्रमुख शिवसेना उबाठा यांच्यासह असंख्य गावकरी मंडळी उपस्थित होते.