spot_img
spot_img

गद्दार की निष्ठावंत ? -तुतारीतून दोन आवाज ? – आ. राजेंद्र शिंगणें यांची दुटप्पी भूमिका अमान्य ! गायत्री शिंगणे यांनी उपसले विरोधाचे हत्यार !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) डॉ राजेंद्र शिंगणे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश घेणार हे जवळपास नक्की झाले असतांना, त्यांच्या पुतणी व त्यांच्या विरोधक असलेल्या गायत्री गणेश शिंगणेयांनी मात्र डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या शरद पवार गटात प्रवेशास विरोध दाखविला आहे.शिवाय राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात जाऊन जिल्हा बँकेसाठी कोट्यावधींचा निधी मिळविल्याने आता त्यांचा पराभव निश्चित असल्याचे मतदारांमध्ये मानल्या जात आहे.

माध्यमांशी बोलताना कुमारी गायत्री शिंगणे या म्हणाल्या की अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यावेळेस नेते म्हणवणारे अनेक जण आपल्या आपल्या स्वार्थासाठी मूळ पक्ष सोडून गेले,परंतु निष्ठावंतांनी शरद पवार व त्यांचा पक्ष दोन्ही सोडले नाही,पक्षचिन्ह बदलल्यानंतर तुतारी हे पक्षचिन्ह घराघरात पोहोचवण्याचे काम मागील एका वर्षात सर्व निष्ठावंतांनी केले. आणि लोकसभेत शरद पवार नावाचा करिष्मा दिसताच सर्व पळपुटे माघारी येण्याची भाषा करत आहेत.आता अशा माघारी येण्याची भाषा करत असलेल्या स्वार्थी लोकांना शरद पवार साहेबांनी तिकीट नाकारायला हवे.परंतु काही परिस्थितीत जर अशा लोकांना आमच्या पक्षाकडून तिकीट देण्यात आले,तर आम्ही सर्व निष्ठावंत मिळून काही वेगळा विचार करूअसे गायत्री शिंगणे म्हणाल्या.

डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना सिन्दखेडराजा मतदारसंघात जर आमच्या पक्षाकडून तिकीट दिले तर, आपण अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याचे गायत्री शिंगणे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. जनतेचे अनेक प्रश्न घेऊन उभी राहत असल्याने जनतेचे प्रचंड प्रेम मला मिळत आहे, अशा परिस्थितीत स्वार्थासाठी कुणाच्याही मागे जाणे ऐवजी अपक्ष म्हणून लढण्याचाच आपला निर्धार असेल, असेही गायत्री शिंगणे म्हणाल्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!