देऊळगाव साकरशा (हॅलो बुलढाणा/गणेश पाटील) “नमस्ते,जय सेवालाल!मै विलास रामावत!सेवादळ राष्ट्रीय अध्यक्ष हुं!अविवाहित रहकर समाज और राष्ट्र के लिये काम कर रहा हुं!
“व्हेरी गुड वर्क!विलास रामावतजी !-पंतप्रधान उद्गारले!”हा संवाद म्युझियम नंगारा वास्तूचे लोकार्पण सोहळ्यात साधण्यात आला .
५ ऑक्टोबर २०२४ शनिवार सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हेलिकॉप्टर पोहरादेवीच्या भूमीवर लँड झाले, निमित्त होते विरासत-बंजारा या सर्वांगसुंदर म्युझियम नंगारा या भव्यदिव्य वास्तूचे लोकार्पण!नामदार संजय राठोड यांचे प्रयत्नाने व संल्पनेतून उभ्या राहिलेल्या नंगारा हे म्युझियम वास्तू कलेचा जगातील एक अप्रतिम नमुना आहे. प्रधानमंत्री मा नरेंद्रजी मोदी यांचे शुभ हस्ते या विश्वधरोहर संत सेवालाल सागर संग्रहालयाचे लोकार्पण लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत राज्यपाल श्री सीपी राधाकृष्णन
,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित पवार उपमुख्यमंत्री ,मा शिवराज चव्हाण, मा प्रतापराव जाधव केंद्रीय राज्य मंत्री,संत महंत यांच्या साक्षीने संपन्न झाला.नंगारा म्युझियमचे प्रवेशद्वार या ठिकाणी स्वागत करण्यासाठी असलेल्या मान्यवरांमध्ये सेवादळ या चळवळीचे व राष्ट्रीय संघटनेचे विलास रामावत विशेष निमंत्रित होते. मा नरेंद्रजी मोदी यांचे आगमन होताच विलास रामावत यांनी अभिवादन केले, कांही क्षणापूरता त्या दोघांच्या मधला संवाद.
“नमस्ते,जय सेवालाल!मै विलास रामावत!सेवादळ राष्ट्रीय अध्यक्ष हुं!अविवाहित रहकर समाज और राष्ट्र के लिये काम कर रहा हुं!
“व्हेरी गुड वर्क!विलास रामावतजी !-पंतप्रधान उद्गारले!”
अभिवादन स्वीकारून व हस्तांदोलन करुन नरेन्द्र मोदी नगारा म्युझियम या सागर संग्रहालयाकडे मार्गस्थ झाले. या क्षणभराच्या भेटीने आनंद तर झालाच पण काम करण्याची प्रचंड ऊर्जा मिळाली. हा प्रसंग व हा संवाद माझ्यासाठी ऐतिहासिक व अविस्मरणीय आहे.
सेवादळ या संघटनेच्या माध्यमातून मी बंजारा समाज व राष्ट्रासाठी व्रतस्थ भावनेने काम करत आहे. आपणही-
“जब कोई राह ना पाये,मेरे संग आये
पग पग दिप जलाये !
‘तेरी दोस्ती.. मेरा प्यार..!