spot_img
spot_img

माँ आदिशक्तींच्या जागरात उद्योगिनींच्या प्रदर्शनीला थोड्याच वेळात प्रारंभ ! -महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची ‘दिशा’ बचत गटाची प्रदर्शनी पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्योग शक्तीचा केंद्रबिंदू असलेल्या दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन अंतर्गत आज पासून 3 दिवस भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनीला येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोरच्या प्रशस्त प्रांगणात थोड्याच वेळात प्रारंभ होत आहे. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच महिलांची तुडुंब गर्दी दिसून येत आहे.

गेल्या वर्षी या प्रदर्शनी मधून 10 कोटींवर उलाढाल झाली होती यावर्षी मात्र हा आकडा जमलेल्या गर्दीवरून अधिक फुगणार असल्याचे दिसते. दीड हजारावर अधिकृत नोंदणी झाली होती. प्रदर्शनीत 250 पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत.
दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन अंतर्गत भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या रोहिणी ताई खडसे यांच्या हस्ते होत आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या सरचिटणीस तथा प्रवक्त्या हेमलता पाटील राहतील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे राहातील.या शिवाय अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत. 4 ते 6 ऑक्टोंबर दरम्यान चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनीची उत्सुकता लागून होती. आज प्रारंभ झालेली ही बचत गटाची प्रदर्शनी भीमथळी जत्रेच्या खाजगी पातळीवर ही पहिली भव्य प्रदर्शनी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!