मुंबई (हॅलो बुलढाणा/वृत्तसंस्था) प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांनी मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. एआयसीसीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक आणि महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या त्यांच्या वाटचालीमुळे राजकीय चर्चेला नवी धार मिळाली आहे. अधिकृत उमेदवारीच्या घोषणेकडे आता लक्ष लागले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी पोहरे कोणती भूमिका मांडणार, याची उत्सुकता आहे.











Total Users : 3536116