बुलडाणा (हॅलो बुलढाणा) रामचरित मानस मध्ये प्रभू श्रीरामाने शबरी मातेला नवद्या भक्तीचा उपदेश करून भक्तीचे नऊ प्रकार सांगितले , त्यामध्ये सर्वात प्रथम भक्ती संतांच्या संग श्रेष्ठ व सोपा आहे, सद्भावना सेवा समिती बुलढाणा द्वारा दिनांक 8 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत मथुरा ,वृंदावन, अयोध्या, वाराणसी, गंगासागर ,कोलकाता, जगन्नाथ पुरी, इत्यादी तीर्थस्थानी दिव्य संकल्प स्पेशल रेल्वे यात्रा आयोजित केली आहे .या दहाही दिवसात संत श्री अलकाश्रीजी चा सत्संग तर आहेच, पण सर्वच ठिकाणी अनेक विद्वान व आध्यात्मिक संतांचे दर्शन होणार आहे, म्हणून “प्रथम भकती संतन कर संगा” हा दोहा रामचरितमानसमध्ये संत तुलसीदास यांनी सांगितला. याचा अनुभव या यात्रेत येणार आहे. म्हणून ही यात्रा भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे.संतांच्या संगति ने ह्रदय पवित्र होते , त्यामुळे विवेकाचा प्रादुर्भाव होतो व मोह नाश होतो आणि जीवन आनंदी होते हा संत संगति चा महिमा आहे असे भावपूर्ण मनोगत सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष आणि यात्रेचे प्रेरणा स्रोत राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले.
सद्भावना सेवा समितीचे सर्व पदाधिकारी भाईजींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेले होते, तेव्हा त्यांनी यात्रेबद्दल आनंद व्यक्त केला. ज्यांनी शंभराच्या वर यात्रेचे बुकिंग केले ,त्यामध्ये चंपालाल शर्मा डॉ. परमेश्वर लढ्ढा ,गोपाल राठी,सुशील सारडा, हरेश मानधना, घनश्याम बागडी, संतोष महेंद्रा, संदीप केला, अशोक राठी, संतोष गुडगिला, मनमोहन मर्दा , हे सर्व दिव्य संकल्प यात्रेचे आधारस्तंभ असून वर्षातून दोन स्पेशल रेल्वे यात्रा काढाव्या असा विचार व्यक्त केले. समितीचे कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा, कोषाध्यक्ष तिलोकचंद चांडक, सुरेश गट्टानी ,सचिव प्रकाश चंद्र पाठक ,सिद्धार्थ शर्मा, सहसचिव उमेश मुंदडा, उपाध्यक्ष राजेश देशलहरा, विजय सावजी, सुभाष दर्डा ,यांनी भाईजीच्यां वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले तेव्हा, भाईजीनी
स्पेशल रेल्वे यात्रेचे संपूर्ण जबाबदारी व व्यवस्थापन करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सद्गुरु परिवार व सद्भावना सेवा समितीचे सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक केले. भाईजी पुढे म्हणाले की या यात्रेत मथुरा वृंदावन येथील कृष्ण लीला स्थळ, राधा राणीचे पवित्र रासलीला, निधुबन ,जमना नदी, द्वारकाधीश मंदिर, बाके बिहारी येथील दिव्य दर्शनासोबत संताचे दर्शन आयोध्या येथील राम मंदिर व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्या संतांचे दर्शन, काशी विश्वनाथ मंदिर , गंगा दर्शन, काशीचे कोतवाल भैरवनाथ मंदिर ,”वाहते ती गंगा आणि थांबतो तो समुद्र” हे अद्भुत मिलनाचे दर्शन, गंगासागर ला होईल . कोलकाता येथे काली मंदिरात भक्ततारीणीचे दर्शन, रामकृष्ण परमहंसांना याच कालीमातेने दर्शन दिले. व याच परिसरात नरेंद्राचे स्वामी विवेकानंद झाले ती खोली पाहायला मिळेल. जय जगन्नाथाचे दर्शन होईल. या सर्वांचा यात्रेकरूंनी लाभ घ्यावा असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी केले. यात्रेकरूंना माहिती देण्यासाठी गाईड उपलब्ध राहतील असेही माहिती दिली.