देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) मातृत्वाच्या प्रेमाची अनेक उदाहरणं आपण नेहमीच पाहतो. मात्र एका निष्ठुर जन्मदात्या आईची ओळख करून देणारी घटना टाकरखेड भागिले येथे समोर आली. या निष्ठूर मातेने केवळ 15 दिवसाच्या स्त्री जातीच्या बाळाला एका घरातील अंगणासमोर सोडून दिले.ही घटना 2 ऑक्टोंबरला घडली.
देऊळगाव राजा पोलीस ठाणे हद्दीतील टाकरखेड भागिले येथे बबन नामदेवराव खरात यांच्या घरासमोरील अंगणात एका अज्ञात निष्ठुर मातेने पंधरा दिवसाचे जिवंत स्त्री जातीचे बाळ बेवारस स्थितीत सोडल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी देऊळगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर बाळाला पोलिसांनी उपचार अर्थ स्त्री रुग्णालय जालना येथे दाखल केले आहे.