बुलढाणा (हॅलो बुलढाणा / रवी घुसळकर) काल महाराष्ट्र शासनाने सोनार समाजासाठी संत नरहरी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. त्यामुळे समाजातील लोकांनी आंनदोत्सव साजरा केला.
बुलडाणा शहरातील कारंजा चौकात समाज बांधवांनी एकत्रित येऊन सुरुवातीला एन.के.बनसोडकर , रवि घुसळकर , यांनी देवी ला हारार्पण केला व उपस्थित बांधवांना पेढे भरवुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.व माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सोनार समाजा तर्फे अभिनंदन करण्यात आले व आभार व्यक्त करण्यात आले. लवकरच मान्यवरांचा सत्कार समारंभ घेण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. तसेच आँल इंडिया सोनार फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर यांच्या अथक प्रयत्ना मुळे समाजाला महामंडळ मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच नांदुरा येथील अनंतराव उंबरकर यांनी देखील महामंडळ मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन करण्यात आले. अशा प्रकारे महामंडळाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात एन.के.बनसोडकर,अमोलसेठ टेहरे , रवि घुसळकर,सुधाकर पळसकर,समाधान घुसळकर, वैभव ईवरकर,रवींद्र पंडितकर,मनोज खंदारकर, योगेश घुसळकर,निलेश अंजनकर,अनिल घुसळकर, श्रीराम भाऊ उज्जैनकर, अविनाश मालवी,मंगेश बनसोडकर, विश्वनाथ ठोसर,निलेश रत्नपारखी, संजय वायाळकर,राजु महांळणकर,रत्नपारखी सर, रवि झरकर,अमोल कर्हे ,संतोष उज्जैनकर, प्रदिप अर्धापुरकर श्रीराम ऊज्जैनकर आदी समाज बांधवांची उपस्थिती होती.