बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि कठोर परिश्रम करून आपल्या जिल्ह्याचे तसेच आई-वडिलांचे नाव उज्वल करावे, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले.
आज दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 रोजी बुलढाणा शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुला-मुलींकरिता बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून आत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त सुसज्ज वातानुकूलित ताराबाई शिंदे नगरपरिषद स्पर्धा परीक्षा अभ्यासिका पूर्णत्वास आलेली आहे. आज रोजी असंख्य स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साक्षीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय विशाल नरवाडे यांच्याहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी श्री गीते साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री अकाळ साहेब, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक ठाकरे , प्रताप पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती!