spot_img
spot_img

घाटबोरी-लोणीगवळी सिमेंट रस्ता रखडला; सामाजिक कार्यकर्त्यांचे अर्धनग्न आंदोलन

मेहकर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील घाटबोरी ते लोणीगवळी या महत्त्वाच्या सिमेंट रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प पडले आहे. अर्धवट अवस्थेत असलेला हा रस्ता आणि धुळीने व्यापलेला परिसर यामुळे स्थानिक नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याचा आरोप होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रस्त्याचे काम बंद पडल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर घाटबोरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अंकुश श्रीराम राठोड आणि राजू तुकाराम कुसळकर यांनी आज अर्धनग्न आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “रस्ता नाही तर विकास नाही,” अशा घोषणा देत परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रखडलेले काम तत्काळ पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!