बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल सातारा जिल्ह्यातील पाटण येथील एका सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डाॅयलाॅबाजीने माहोल तयार केला होता. लाडक्या बहिण योजनेवरून ‘आमची देना बॅंक आहे, लेना बॅंक नाही.’ तसेच ‘एक बार कमिटमेंट की तो में खुद की भी नहीं सूनता’अशी हिंदीत डाॅयलाॅगबाजी केलीतर शेवटी बदलापूर प्रकरणावरून ‘चुकीला माफी नाही ‘असे म्हणत त्यांनी विरोधकांना चांगलेच डिवचले. दरम्यान बुलढाणाचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिकांचा चांगलाच जोश वाढविला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल सातारा जिल्ह्यतील पाटण मतदार संघातील 289 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दाैलतनगर- मरळी येथे आयोजित सभा त्यांनी चांगलीच गाजवली. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचे लोकार्पण,केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे नूतनीकरण इमारतीचे लोकार्पण तसेच मल्हारपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला
बुलढाणाचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याला
राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, सातारा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.