spot_img
spot_img

अन् माणुसकी गहिवरली ! -अपघातग्रस्त वानरावर विधिवत अंत्यसंस्कार..

मलकापूर (हॅलो बुलढाणा /करण झनके) हिंदू धर्मात हनुमानाचा अवतार अशी धारणा असलेल्या वानराचा चार चाकी वाहनाच्या धडकेत धरणगाव येथे मृत्यू झाला.या तडफडणाऱ्या वानराला पाहून हनुमान सेनेच्या कार्यकर्त्यांची व गावकऱ्यांची माणुसकी गहिवरली आणि या वानराची विधीवत अंत्ययात्रा काढत त्याचेवर अंत्यसंस्कार केले.

धरणगाव येथे एका चार चाकी वाहनाने वानराला धडक दिली. दरम्यान तडफडणाऱ्या दुखापतग्रस्त वानराला ग्रामस्थांनी वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले.वानराचा मृत्यू झाल्याने हनुमान सेनेच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी एकत्रित येत या वानराचा विधीवत अंत्यसंस्कार केला.यावेळी हनुमान सेनेचे सचिन मोळे, निवृत्ती कवळे,वामन कवळे, अमोल पाटील, अमोल मोरे, प्रशांत पाटील व गावकरी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!