spot_img
spot_img

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी लोणार तहसीलदार भुषण पाटील यांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी यांच्या नेतृत्वात निवेदन दिले.

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे rअध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी
पोलिसांनी शेतकऱ्यांच्या रक्ताचे पत्र फाडल्याच्या निषेधार्थ बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा निवेदन देण्यात आले आज शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मोठ्या संकटात सापडलेला आहे. सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदनशील बनवण्यासाठी चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन लिहले होते. त्यावर तब्बल 3000 शेतकऱ्यांनी सह्या केल्या होत्या.
19 सप्टेंबर 2024 रोजी बुलढाणा येथे माननीय मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार राहुल भाऊ बोंद्रे व त्यांचे सहकारी गेले असता पोलिसांनी त्यांची अडणूक केली व जबरदस्तीने निवेदन हिसकावून ते फाडून टाकले. दंडुकेशाहीच्या जोरावर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिसांनी जगाला जगवणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या रक्तांचा केलेला हा घोर अपमान आहे आम्ही हे सहन करणार नाही सदर निवेदनामध्ये सोयाबीनला सात हजार रुपये भाव, थकलेला पिक विमा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन अनुदानाचा अनुशेष, शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास वीज, वन्य प्राण्यांपासून संरक्षण आदी शेतकरी हीताच्या मागण्यांसाठी सदर निवेदन होते या अपमानाविरोधात 23 सप्टेंबर 2024 पासून सावरगाव डुकरे तालुका चिखली या गावी शेतकरी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहोत गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्या केलेल्या शेतकरी विरोधी कृत्यासाठी माफी मांगेपर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन राहील. त्यामुळे शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून माफी मागावी यासाठी आम्ही निवेदन करत आहोत. तसेच सदर अन्नत्याग आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. या निवेदनावर माजी जिल्हा सरचिटणीस साहेबरावजी पाटोळे, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते भूषण मापारी, उपनगराध्यक्ष बादशाह खान,राजीव गांधी पंचायतराज तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिभडे, ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी, नगरसेवक संतोष मापारी,ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास
माजी बांधकाम सभापती प्राध्यापक सुदन कांबळे, माजी नगरसेवक पंढरी चाटे,मा.नगरसेवक सतीश राठोड, शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रामचंद्र कोचर, चिटणीस आप्पा शिंदे,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विकास मोरे, उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!