spot_img
spot_img

बिबट्या,तडस्या वाघोबा पाहिला असेल पण हे बोकोबा पाहिलेत का? -बोकोबांनी केले जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळे मिटून कोट्यावधींचे साहित्य फस्त ! -यांच्या शिकारी कोण करणार ? -शिकारी सुद्धा पैशांच्या जाळ्यात अडकले काय?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जंगलव्याप्त बुलढाणा जिल्ह्यात खामगाव व अकोला रस्तावरील ज्ञानगंगा अभयारण्य असल्याने आपण बिबट्यां सारख बोक,,तडस,वन्य प्राणी पाहिले असाल किंवा डोळे मिटून दूध पिणारी मांजर व बोक्या घरामध्ये पाहिला असाल परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यावधींचे उपकरणे बोगस बिल काढून खाणारे बोके,तडस,मांजर काही वगळता वरिष्ठांच्या पिंजऱ्यांमध्ये अजूनही अडकलेले नाहीत. केवळ एक अत्यंत खादाडा प्राणी जाळ्यात अडकला की अडकवलाय?हा प्रश्न असून इतरांचा मुक्त संचार सुरू असून अकोला आरोग्य उपसंचालकापर्यंत साखळी असलेल्यांची कोण शिकार करणार ? असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यावधींचा प्रचंड भ्रष्टाचार झाला असून आरोपींवर दोष सुद्धा सिद्ध झाला आहे.अंतिम विभागीय चौकशी अहवालाने हे दाखवून दिले तरी केवळ वादग्रस्त भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे सस्पेंड झाला. मात्र उपसंचालक भंडारी यांना पुढील कारवाईस अद्याप पर्यंत मुहूर्त का भेटला नाही हे न समजणारे कोडे आहे. पण ‘पब्लिक सब जानती है’ हे त्यांना माहीत नसावे..जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारी प्रकाश नामदेव बोथे मुळ चालक,नंतर कनिष्ठ लिपीक यांची विभागीय चौकशी 24 एप्रिल 2024 रोजी प्राप्त झाली.कार्यालयीन दोष व शासकीय रकमेचा अपहार, खरेदी घोटाळा असे गंभीर स्वरूपाचे आरोप बोथेवर असल्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. याप्रकरणी त्याला नोकरी पासून हात धुवावे लागले. जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारी प्रकाश नामदेव बोथे मुळ चालक, नंतर कनिष्ठ लिपीक यांची विभागीय चौकशी 24 एप्रिल 2024 रोजी प्राप्त झाली.कार्यालयीन दोष व शासकीय रकमेचा अपहार, खरेदी घोटाळा असे गंभीर स्वरूपाचे आरोप बोथेवर असल्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. याप्रकरणी त्याला नोकरी पासून हात धुवावेत लागले.परंतु या भ्रष्टाचाराच्या तळ्यातील अनेकांनी पाणी पिले असून ते मात्र अलिप्तच आहेत. शिवाय दोषारोपसिद्ध होऊन देखील अकोला आरोग्य उपसंचालक भंडारी या भ्रष्टाचाराच्या पंढरीकडे अजूनही वळून पाहत नाहीत.त्यामुळे भ्रष्टाचाराची साखळी असलेल्या या खाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड रोष निर्माण होत असून अनेकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.या भ्रष्टाचार प्रकरणी दैनिक जनसंचलन,सिटी न्यूज वृत्तवाहिनी व हॅलो बुलढाणा ने पाठपुरावा केला होता हे विशेष !

नेहमी चर्चेत असलेले निलंबित भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे 
यांच्यासह इतरांची झालेल्या चौकशीत करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात दोष सिद्ध झाले असून निलंबित वादग्रस्त भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे यांना बडतर्फ करून भ्रष्टाचारातुन
कमावलेली करोडो रुपयांची चल अचल संपत्ती त्वरित सील करून त्याचे लिलाव करण्यात यावा असे विभागीय अहवालात नमूद असून उपसंचालक डॉ.कमलेश भंडारी यांना ऑगस्ट महिन्यात पत्र देऊनही अद्याप त्यांनी कोणतीच कारवाई केली नसून त्यांना या प्रकरणाची माहितीसाठी कॉल करूनही हे अधिकारी कॉल सुद्धा घेत नाही व माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!