बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक आमदार यांचे नाव न घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बुलढाण्यातील एका सभेतून घणाघात करत आहेत.स्थानिक आमदार यांचे नाव न घेता ‘धर्मवीर कसला वाचाळवीर ‘ असे विधान करताच टाळ्यांचा गडगडाट झाला.दरम्यान दानवे यांनी बुलढाण्यात 20 टक्के काम आणि 80 टक्के कमिशन चालू असल्याचाही आरोप केला.
जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात 150 गावातून निघालेली मशाल यात्रा लक्षवेधी ठरली.या मशाल यात्रेचे रूपांतर आक्रोश मोर्चा मध्ये झाले.दरम्यान या मोर्चात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली तोफ डागली.ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची नितांत गरज आहे परंतु या 50 खोके देणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांना छद्दाम देता येत नाही.शेतकरी आत्महत्या करत आहेत.शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नाही त्यांना कर्जमाफी मिळत नाही पिकांना भाव वाढ नाही अतिवृष्टीची मदतही नाही परंतु पुतळे मात्र उभे केले जातात.या महापुरुषांच्या पुतळ्यांचे अभिनंदन आहे परंतु महाराष्ट्र सरकारला थोडी लाज वाटली पाहिजे. सिंधुदुर्ग येथे शिवरायांचा पुतळा सहा महिन्यातच कोसळला हे सर्व भ्रष्टाचार झाल्याचा परिणाम असल्याचे दानवे म्हणाले.बुलढाण्यात पुतळे उभारल्याने धर्मवीर होत नाही हा तर वाचाळवीर आहे. ही कसली शिवभक्ती आहे ? धर्मवीर कसा असतो हा तर गद्दार आहेअसेही दानवे म्हणाले.
(क्रमशा)