बुलढाणा (हॅलो बुलढाणा)हभप विदर्भरत्न,रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर गुप्तेश्वर आश्रम शिर्ला नेमाने यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे देण्यात येणारा सन 2024 चा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार नुकताच मिळाला. त्यानिमित्त बुलढाणा व मोताळा तालुक्याच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.
वारकरी संप्रदायातील सर्वोत्कृष्ट सामाजिक,धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा मानाचा पुरस्कार प्रथमच विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांना मिळाला. करीता भव्य नागरी वारकरी संप्रदायीक सत्काराचे नियोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात 25 सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता मोताळा तालुक्यातील विठ्ठल रुक्मिणी आश्रम वागजाळ फाटा, या ठिकाणी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सत्कार समितीचे अध्यक्ष वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेत सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील हभप, वारकरी, सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी सदर आयोजन बैठकीला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सत्कार समिती आयोजन समितीच्या वतीने हभप रामभाऊ महाराज झांबरे, हभप विजय महाराज खवले,हभप सतीशचंद्र रोठे पाटील, हभप निनाजी महाराज खोडके,हभप शिवदास महाराज रहाणे, हभप संजय महाराज गौंड, हभप गोपाल महाराज कचोरे, हभप आनंदा महाराज दहिगाव, हभप अक्षय महाराज तायडे, देविदास महाराज केसापूरकर, हभप त्र्यंबक महाराज राऊत दहिदकर यांनी केले आहे.