spot_img
spot_img

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चंद्रकांत बर्दे यांचा पक्षप्रवेश !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पत्रकारांना राजकीय अभ्यास असतो.शिवाय त्यांचा जनसंपर्क ही दांडगा असतो.आणि समाजाचे ते वृत्तपत्रातून प्रतिबिंबि उमटवित असतात.असेच पत्रकार चंद्रकांत बर्दे यांचा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व भाजपा लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रवेश झाला.

क्षेत्र कोणतेही असो पत्रकार जनसामान्यांना दिशा देण्याचे काम करत असतात.त्यामुळे समाजकारणाची आणि राजकारणाची आवड असलेले चंद्रकांत बर्दे हे भाजपाच्या वाटेवर होते.अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता महाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे, जिल्हा सचिव सुनील देशमुख, डाॅक्टर सेल जिल्हाध्यक्ष डाॅ. राजेश्वर उबरहंडे, जिल्हाउपाध्यक्ष दत्ता पाटील, भाजपा जेष्ट नेते गणेश देहाडराय यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!