spot_img
spot_img

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी २२ सप्टेंबरला उल्कानगरीत!

लोणार (हॅलो बुलढाणा /राहुल सरदार) मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त लोणार येथे डॉ.जाकीर हुसेन ज्युनियर कॉलेजमध्ये सिरत क्विज कॉम्पिटिशन आयोजित केले आहे. हा कार्यक्रम रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असून, याचे निकालही त्याच दिवशी जाहीर केले जातील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या मान्यवरांचे हस्ते विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत.

याच दिवशी ईद मिलादुन्नबी निमित्त एक भव्य कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जमियते उलमाए हिंदचे राज्याध्यक्ष हाफीज नदीम सिद्दिकी आणि विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन शाह कासमी येणार आहेत.त्यांच्यासोबत जिल्ह्यातील व राज्यातील अनेक पदाधिकारी व प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व बुलढाणा जिल्हा वासियांनी २२ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० ते ५:०० वाजेपर्यंत आपला अमूल्य वेळे काढून बहुसंख्येत उपस्थित रहावे, अशी विनंती जमीयतचे तालुकाध्यक्ष ऍड. मोहम्मद रिजवान जड्डा यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!