बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन शहर व परिसरातील नागरिकांना उत्तम मनोरंजनात्मक मेजवानी दिली. दरवर्षी प्रमाणे यंदाही अथर्वशीर्ष पठण पासून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमांचे समतोल राखतांना यामध्ये प्रामुख्याने प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे व सौ सन्मिता धापटे-शिंदे यांचा मोगरा फुलला या संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या अभंग व ओव्यांवर आधारित निरुपम कार्यक्रमाचे आयोजन करुन गणेशभक्तांना एक वेगळीच भेट दिली. याशिवाय शहर व परिसरातील विविध भजनी मंडळे यांचा सुरेख कार्यक्रमाचे आयोजन, तसेच विद्यार्थींसाठी वकृत्व स्पर्धा ठेवण्यात आली होती. बुलडाणा अर्बन महिलांसाठी एक मिनिट हि स्पर्धा देखील मंडळाच्या वतीने ठेवण्यात आली होती. बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी कर्मचाऱ्यांच्या आंतरिक कलागुणांना हेरुन त्यांच्यातल्या कलाकारांसाठी संगीतमय ऑर्केस्ट्रा ठेवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. निसर्गाच्या संगोपनासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला विविध वृक्षांचे वाटप करून भाईजींनी एक आदर्श निर्माण केला. संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पुढील वर्षी सुध्दा यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येईल. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या
गणपती विसर्जन मिरवणुकीत टाळ- मृदंगाच्या ठेक्यावर अबालवृद्ध दंग होऊन गेले होते.
यामध्ये प्रामुख्याने पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. संस्थेचे अध्यक्ष श्री राधेश्याम चांडक व चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली होती. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या सांगता करतांना दि. 18 सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांसाठी आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या आनंद मेळाव्यामध्ये कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारच्या खाद्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक व चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर, अनंताभाऊ देशपांडे यांच्या सह बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेश चेकेटकर व सचिव प्रशांत काळवाघे व सर्व सदस्य तसेच मुख्यालयातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिकांना याचा मनमुराद आस्वाद घेतला.