spot_img
spot_img

आमदारांचा एक कॉल आणि विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सॉल! -आ.संजय गायकवाड यांनी कॉल केल्याने ‘या’ गावात बस सेवा सुरू होणार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काही ग्रामीण भागात अजूनही ‘लालपरी’ पोहोचलेली नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना दळणवळणाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊन प्रवासाला ब्रेक लागला आहे.मोताळा तालुक्यातील परडा,शिरवा व सहमुडी येथील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने त्यांनी तहसीलवर मोर्चा काढला. परंतु डाळ शिजत नसल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी चक्क आमदार संजय गायकवाड यांना मोबाईल वरून कॉल केला. दरम्यान आमदार घटनास्थळी दाखल झाले आणि विभागीय आयुक्तांना कॉल लावून तात्काळ बस सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्याने प्रॉब्लेम सॉल झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात अजूनही राज्य परिवहन महामंडळाची लोकवाहिनी समजली जाणारी एसटी पोहोचलेली नाही.बसच्या फेऱ्याच होत नसल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, बससेवे अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.परिणामी बंद असलेली लाल परीची चाके रस्त्यावर धावावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मोताळा तालुक्यातील परडा,शिरवा व सहमुडी येथील विद्यार्थ्यांनीही ही ओरड सुरूच केली नाही तर तहसील कार्यालयावर चक्क मोर्चा काढला.बस सुरू व्हावी,अशी मागणी रेटून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मोबाईल वरून कॉल करण्यात आला.दरम्यान आमदारांनी तेथे पोहोचून विभागीय आयुक्तांना कॉल करून बस कार्यान्वित करण्याचे सुचविल्याने विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सॉल झाला आहे.परंतु काही ग्रामीण भागात अजूनही असे सुरू नसल्याची दुर्दैवी बाब आहे. बसअभावी विद्यार्थ्यांना ये-जा करणे मुश्कील होत असून, खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत आहे. परंतु, खासगी वाहने देखील त्यांच्या वेळेनुसार धावत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचे होत आहे. बसअभावी रुग्ण, शेतकरी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधणे गरजेचे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!