spot_img
spot_img

‘अन्नत्यागा’मुळे त्यागवीर रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली! -छ.संभाजीनगर येथील एम.जी.एम रुग्णालयात उपचार सुरू.. -तूपकर म्हणाले..माझी चिंता करू नका, कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांसाठी सिंदखेडराजा येथे सलग चार दिवस अन्यथा आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील एम.जी.एम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

काल ७ सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्या बैठकीच्या निमंत्रणावरुन त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. सिंदखेडराजा येथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविकांत तुपकरांची शुगर लेवल अत्यंत कमी झाली असून थ्रोट इन्फेक्शन व किडण्यांवरही परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी तुपकर यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगितले. दरम्यान माझ्या प्रकृतीची चिंता करू नका शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन लवकरच बाहेर पडणार आहे. माझ्या भेटीसाठी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरला येऊ नये, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!