spot_img
spot_img

‘त्या चॅलेंज देणाऱ्याला मी मोजत नाही!’ -आमदार संजय गायकवाड आणखी काय म्हणाले?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) माजी आमदार विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना या ना त्या कारणावरून खुले,चॅलेंज देत आहेत, इशारा देत आहेत.तुम्ही त्यांना काय इशारा देणार? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीने विचारला असता,आमदार संजय गायकवाड यांनी आपले परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले की चॅलेंज करणारे माजी आमदार चायलेंज करायच्या लायकीचे नाहीत.मी त्यांना मोजत नाही. पत्रकारांसह बुद्धिजीवींच्या साक्षीने एक समिती निवडा एक जज निवडा व खुला जनता दरबार भरून आमने-सामने प्रश्नोत्तरे होऊ द्या यासाठी मी तयार आहे,असे गायकवाड म्हणाले.

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे वाकयुद्ध सुरू आहे.या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने माजी आमदार तुम्हाला खुले चॅलेंज देत असल्याने तुम्ही कोणते चायनीज देणार असा प्रश्न आमदार गायकवाड यांना पत्रकाराने विचारले.दरम्यान संजय गायकवाड म्हणाले की,मी कुणाला चायलेंज करीत नाही.जे बरोबरीचे आहेत त्यांना चॅलेंज करायचे असते.जे गिणतीत नाही त्यांना चॅलेंज करत नसतात.मी त्यांना यासाठी मोजत नाही की,त्यांनी आमदार पद भोगले आहे.परंतु जे मी विकास कामे केली ती त्यांना करता आली नाही.त्यांना जर जास्तच खाज असेल तर सर्व पत्रकारांसह व शहरातील बुद्धिजीवींच्या साक्षीने एक समिती निवडावी.एक जज निवडावा आणि जनता दरबार भरवावा. आमने सामने त्यांना जे काय प्रश्न विचारायचे असेल ते त्यांनी विचारावे.वैयक्तिक व वादग्रस्त विषय सोडून आमदारांच्या जबाबदारी संदर्भातील सकारात्मक प्रश्न विचारावे.चर्चा करावी.विचारलेले प्रश्न दोन दिवस समितीकडे द्यावे.समितीने छाननी करून निर्णय द्यावा. यासाठी मी तयार आहे,असे गायकवाड म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!