सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/ निलेश डिघोळे) नारीशक्तीचे विविध रूप आहेत.आजची नारी प्रत्येक क्षेत्रात अग्रणी आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्र काबीज केले असून,राष्ट्रमाता मॉ जिजाऊंच्या मातृतिर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील प.पू.तेजस्वी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वरोडी गावातील सौ. रंजना गारोळे नव्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी बिनविरोध झाल्या.जिल्ह्यातील तंटामुक्ती अध्यक्षपदाचा हा मान महिलेला प्रथमच मिळाला असावा.
वरोडी येथे दि २६ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंचा सौ. अन्नपूर्णा सुधाकर गारोळे ह्या होत्या तर सचिव सरला गावडे ,ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पुंजाजी गारोळे माजी उपसरपंच सुमेध गवई, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप खरात कृषी सहाय्यक पाचरणे यांची प्रमुख उपस्थिती होती, सुरुवातीला तंटामुक्ती अध्यक्ष पदाकरता अनेकांनी अर्ज दाखल केले होते परंतु पहिल्यांदा तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी महिलेला संधी दिली पाहिजे अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊन अनेकांनी अर्ज मागे घेतले व बुलढाणा जिल्ह्यातून पहिल्यांदा वरोडी गावांमधून सौ. रंजना भास्कर गारोळे यांची बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्यांची निवड होताच पोलीस पाटील सुनील गारोळे,भास्कर महाराज गारोळे,गौतम वानखेडे आदिनाथ गारोळे भागवत गुंजकर मनोहर गारोळे,दिलीप गवई ठेकेदार मिलिंद मोरे ,यांनी नवनिर्वाचित महिला तंटामुक्ती अध्यक्ष यांचे स्वागत केले. पहिल्यांदा तंटामुक्तीच्या अध्यक्षपदाकरता महिलेची निवड करण्यात आली असून ही बाब इतर गावांसाठी प्रेरक ठरणारी आहे.











