spot_img
spot_img

दुष्काळाने घेतले आणखी दोन बळी? चाऱ्यासाठी गेलेले दोन तरुण परतलेच नाहीत!

सिंदखेडराजा/भोसा माळ (हॅलो बुलढाणा) जनावरं उपाशी राहू नयेत म्हणून चारा आणायला गेले होते. पण त्या दोन तरुणांना काय माहित… भोसा माळाचा तो उतार त्यांच्यासाठी काळाचा घाला ठरणार आहे म्हणून! एका क्षणात सगळं संपलं.

मंठा तालुक्यातील वडगाव केहाळ येथून सोयाबीन भुसाने भरलेला ट्रॅक्टर सिंदखेडराजा तालुक्यातील धांदरवाडी (दत्तापूर) कडे निघाला होता. ट्रॅक्टरवर होते दोन तरुण माऊली अनंतराव दवने (वय २२) महेश प्रकाश रणवीर (वय १९) वर्दडी-चिंचोली मार्गाने जात असताना भोसा माळातील तीव्र उतारावर ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं. क्षणात ट्रॅक्टर पलटी झालं. आणि दोघंही त्या ट्रॅक्टरखाली दबले गेले.यंदा दुष्काळ आहे. पाऊस नाही, पीक नाही, आणि जनावरांना चारा नाही.
म्हणूनच शेतकरी, पशुपालक जिथून मिळेल तिथून नातेवाईकांकडून, मित्रांकडून, विकत घेऊन सोयाबीन भुसा आणत आहेत. जनावरं जगवण्यासाठी धडपडत आहेत.आणि याच धडपडीत दोन तरुणांचा जीव गेला. हा फक्त अपघात आहे का? की दुष्काळाने घेतलेला आणखी एक बळी आहे?

▪️दोन घरात आक्रोश…!

एका घरात २२ वर्षांचा माऊली गेला. दुसऱ्या घरात १९ वर्षांचा महेश गेला. दोघांच्याही पश्चात आई-वडील, बहीण-भाऊ आहेत. आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. बापाचं काळीज फाटतंय. बहिणीचा भाऊ गेला, भावाचा साथीदार गेला.
एका क्षणात दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!