spot_img
spot_img

देऊळगाव राजात उद्या तुपकरांचा ‘भीक मांगो’ दणका! सरकारला भीक दान करणार शेतकरी; सहदेव लाड यांनी फुंकले आंदोलनाचे रणशिंग!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) कर्जमाफीचा प्रश्न अन् दुष्काळी मदतीवरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी आता रस्त्यावर उमटणार! क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या, सोमवार १९ ऑक्टोबर रोजी देऊळगाव राजा येथे अनोखे ‘भीक मांगो’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

सरकारने जाहीर केलेली दुष्काळी मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान गोळा झालेली भीक थेट राज्य सरकारला दान करून सरकारच्या धोरणांविरोधातील संताप व्यक्त केला जाणार आहे!

सकाळी ठीक ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार असून, तहसील कार्यालयापर्यंत आंदोलक मोर्चाने जाणार आहेत.

राज्यभर विविध आंदोलनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे रविकांत तुपकर आता देऊळगाव राजात सरकारला नेमका कोणता इशारा देणार, याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!