बुलढाणा (हॅलो बुलढाणा विशेष) अमरावती शिक्षक मतदारसंघात शिक्षकांच्या मतांवर डोळा ठेवून पैशांचा आणि पैठणीचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. माजी आमदार किरण सरनाईक यांच्या प्रचारात दोन हजार रुपयांची नोट, पैठणी साड्या आणि बोगस ‘ॲडव्होकेट’ पदवीचा वापर होत असल्याची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे गेली आहे.
१७ ऑक्टोबर रोजी बुलढाण्यातील देऊळघाट रोडवरील एका हॉटेलमध्ये झालेल्या सरनाईकांच्या कॉर्नर मीटिंगने त्यांच्या दाव्यांची पोलखोल केली. ज्या शिक्षक मतदारसंघासाठी ते उभे आहेत, तिथे बैठकीत शिक्षकच नव्हते! गर्दी दाखवण्यासाठी इतर लोकांना आणून खुर्च्या भरण्याची वेळ त्यांच्यावर का आली? हा प्रश्न आता शिक्षक विचारत आहेत.
▪️सहा वर्षे आमदारकी उपभोगली, पण काय केले?
बुलढाण्याच्या शिक्षकांसाठी काय केलं?
हा सर्वात मोठा सवाल आहे. सहा वर्षे विधान परिषदेची आमदारकी, पगार, सत्ता, गाडी, बंगला सगळं उपभोगलं. पण बुलढाण्यातील शिक्षकांसाठी काय केलं?किती शाळांना भेटी दिल्या?
किती शिक्षकांचे प्रश्न सभागृहात मांडले? जुनी पेन्शनसाठी एक तरी ठोस पाऊल उचलले का?पत्रकारांशी आणि शिक्षकांशी संवाद तरी कधी साधला का?
या प्रश्नांची उत्तरं सरनाईकांकडे नाहीत. म्हणूनच आता मतांसाठी २००० रुपये आणि पैठणीचा आधार घ्यावा लागत आहे, अशी जोरदार चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
▪️आचारसंहितेचा भंग? अनिल काळेंची थेट तक्रार!
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत तक्रारदार अनिल काळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग जप्त करून तपासणी करण्याची मागणी केली आहे. जर आरोप खरे असतील तर ही निवडणूक नव्हे, तर लोकशाहीचा बाजार आहे.शिक्षक मतदार आता हुशार झाला आहे. त्याला पैठणी नको, तर हक्काची पेन्शन हवी आहे. त्याला नोटा नको, तर ६ वर्षांचा हिशेब हवा आहे.






Total Users : 3631049