spot_img
spot_img

शेंबा बु.मध्ये डेंग्यूची दस्तक; आरोग्य पथकाची घराघरांत धडक! रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह; तापाच्या रुग्णांचा शोध, साचलेल्या पाण्यावर नजर!

नांदुरा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील शेंबा बु. येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गावातील रहिवासी आसावरी प्रवीण वराडे यांचा डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने १२ ऑक्टोबर रोजी गावात विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. आता डासांची पैदास रोखण्यासाठी प्रत्येक घरातून खबरदारी घेण्याची गरज आहे.

आरोग्य पथकाने घरोघरी जाऊन जलद ताप सर्वेक्षण केले. ताप असलेल्या संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. संपूर्ण गावात कंटेनर सर्वेक्षण करून पाणी साठवलेल्या भांड्यांची तपासणीही करण्यात आली. साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मंडाले, जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी पांडे व होगे, तसेच डॉ. रिंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. आरोग्य सहाय्यक वैराडकर, कीटकशास्त्रज्ञ मयूर शिरसाठ, प्रदीप झनके, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक आणि आशा सेविका सहभागी झाल्या.

पाणी साचू देऊ नका, दर आठवड्याला कोरडा दिवस पाळा आणि ताप आल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आता महत्त्वाचा ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!