बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गरब्याचा ताल, उत्सवाचा जल्लोष आणि त्यातून अन्नदात्याच्या प्रश्नांची जाणीव! बुलढाणा अर्बन-हॅलो बुलढाणा आयोजित गरबा महोत्सव २०२६ मध्ये कु. नित्यश्री संतोष शिंगणे हिने पारंपरिक नृत्याला सामाजिक संदेशाची जोड देत उपस्थितांचे लक्ष वेधले. तिच्या कल्पक सादरीकरणाची दखल घेत सहकार विद्या मंदिरतर्फे तिला ‘उत्कृष्ट सामाजिक संदेश’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शेतकऱ्यांचे जीवन, शेतीचे महत्त्व आणि अन्नदात्याप्रती समाजाची जबाबदारी या विषयांना नित्यश्रीने आपल्या कलेतून आवाज दिला. उत्सवाच्या आनंदातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भान जपणारे तिचे सादरीकरण सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारे ठरले.
नृत्याच्या प्रत्येक आविष्कारातून समाजप्रबोधनाचा प्रयत्न करत तिने गरब्याच्या व्यासपीठावर वेगळी छाप उमटवली. कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून जनजागृती करता येते, हे तिच्या उपक्रमाने अधोरेखित केले.
या सन्मानामुळे नित्यश्रीच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले असून, सामाजिक विषयांना कलात्मक अभिव्यक्ती देणाऱ्या तिच्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे. तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.






Total Users : 3602992