spot_img
spot_img

जगण्याची उमेद कायम… पण ३० लाख आणायचे कुठून?पाडळी शिंदेच्या विजयची आजाराशी झुंज; कुटुंबाची समाजाला मदतीची आर्त हाक!

देऊळगाव राजा (संतोष जाधव/हॅलो बुलढाणा) देऊळगाव राजा वय अवघे ३२ वर्षे… कुटुंबासाठी कष्ट करण्याच्या वयात विजय गजानन शिंदे लिव्हरच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. पाडळी शिंदे येथील या तरुणाला तातडीने लिव्हर प्रत्यारोपणाची गरज असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, उपचारांचा २५ ते ३० लाखांचा खर्च उभा करायचा कुठून, या प्रश्नाने कुटुंब हतबल झाले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून विजय यांच्यावर उपचार सुरू आहेत. नातेवाईकांची मदत आणि उसनवारीतून आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले. प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाचा प्रमुख आधारच आजारी पडल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. उपचारांसाठी धडपड सुरू आहे; मात्र एवढी मोठी रक्कम जमवताना कुटुंबाच्या मर्यादा आड येत आहेत.

दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनो, विजयच्या मदतीला पुढे या! प्रत्येक छोटी मदत उपचारांचा मार्ग सुकर करू शकते. मदत शक्य नसल्यास आवाहन इतरांपर्यंत पोहोचवावे, अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे.

मदतीसाठी — विजय गजानन शिंदे, पाडळी शिंदे, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा.
फोनपे / गुगल पे : 7875610468

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!