spot_img
spot_img

गजानन घोंगडे म्हणाले.. “काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाला सोडणार नाही!” स्मशानभूमी ते गोरणाळ रस्त्याचे काम सुरू; आंदोलनानंतर कामाला गती, घोंगडे यांची घटनास्थळी पाहणी!

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा) धामणगाव बढे येथील स्मशानभूमी ते गोरणाळ या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते व भाजपा बुलढाणा जिल्हा उपध्यक्ष गजानन घोंगडे यांनी केलेल्या आमरण उपोषणाची अखेर प्रशासनाने दखल घेतली. आंदोलनानंतर 28 सप्टेंबर रोजी उपोषण मागे घेण्यात आले आणि त्यानंतर रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

मात्र, काम सुरू झाल्यानंतर त्याला अपेक्षित गती मिळत नसल्याने काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच गजानन घोंगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याच्या कामाला तातडीने गती देण्याची मागणी केली.

यावेळी घोंगडे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना, “जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही,” अशी भूमिका मांडली. पुन्हा आंदोलनाची वेळ आल्यास नागरिकांमध्ये असलेल्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर रस्त्याच्या कामाला काही प्रमाणात गती देण्यात आली असून सध्या प्रत्यक्ष काम सुरू आहे. दरम्यान, गजानन घोंगडे यांनी आज स्वत घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी समर्थकांसह त्यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेत संबंधितांकडून माहिती घेतली.

स्मशानभूमी ते गोरणाळ हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असून, रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आंदोलनानंतर कामाला सुरुवात झाली असली तरी काम पूर्ण होईपर्यंत आपण त्यावर लक्ष ठेवणार, अशी भूमिका गजानन घोंगडे यांनी घेतली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!