spot_img
spot_img

टिनशेडच्या आड नेमकं काय सुरू होतं? चिखली पोलिसांचा अचानक छापा; 3 जण ताब्यात!

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) शहरातील जुगार-मटका अड्ड्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा फास आवळला आहे. बस स्टँड परिसरातील पटेल गल्लीमध्ये टिनशेडच्या आडोशाला सुरू असलेल्या कथित वरली-मटका जुगारावर चिखली पोलिसांच्या डीबी पथकाने 16 सप्टेंबर रोजी अचानक छापा टाकत तीन जणांना ताब्यात घेतले.

गोपनीय माहितीच्या आधारे पंचांसमक्ष करण्यात आलेल्या या कारवाईत गणेश जगदेव गवई (49), विष्णु सदाशिव धुंदळे (47) आणि विकास समाधान भटकर (45) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, तीन बॉलपेन, हाफ कार्बनचे तुकडे आणि ₹7,040 रोख, असा एकूण ₹7,055 चा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगितले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात पीएसआय शरद भागवतकर व डीबी पथकाने ही कारवाई केली

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!