चिखली (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील वैरागड येथे आज गुरुवारी दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास अक्षरशः थरारक प्रसंग घडला. गव्हाणे यांच्या शेतातील विहिरीत अचानक बिबट्या पडल्याची माहिती मिळताच वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आरएफओ वाकोडे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. काही वेळातच बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र खरी धडकी भरवणारी घटना त्यानंतर घडली!
पिंजरा विहिरीतून वर ओढत असताना तो विहिरीच्या कडेला असलेल्या लोखंडी टोकामध्ये अडकला. याच गोंधळात पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्याची संधी मिळताच बिबट्याने क्षणाचाही विलंब न करता जोरदार झेप घेतली आणि थेट शेताच्या दिशेने धूम ठोकली.
क्षणातच घटनास्थळी एकच आरडाओरड सुरू झाली – “पळा… पळा… पळा… बिबट्या सुटला!” बिबट्या वेगाने शेतातून पसार होताच उपस्थित नागरिकांसह कर्मचाऱ्यांमध्येही काही काळ धावपळ उडाली. या रेस्क्यू मोहिमेत आरएफओ वाकोडे, वनपाल नेव्हरे, वनरक्षक पैठणे मॅडम तसेच रेस्क्यू टीम उपस्थित होती. गावातील सामाजिक कार्यकर्ते मुकेश भंडारे यांनीही घटनास्थळी मदत केली.
बिबट्या विहिरीतून बाहेर पडला असला तरी तो परिसरातच असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. वनविभागाने मात्र जीव धोक्यात घालून केलेल्या रेस्क्यू प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला












Total Users : 3472338