बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आता बुलढाण्यातील चिमुकल्या डान्सर्सना आपली कला दाखवण्यासाठी मिळणार आहे मोठं व्यासपीठ! बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळातर्फे ‘नाच रे मोरा बालनृत्य स्पर्धा 2026’ आयोजित करण्यात आली असून, इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी रंगणाऱ्या या स्पर्धेकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला 7 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला 5 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला 3 हजार रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येकी 500 रुपयांची दोन प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र मिळणार असून प्रवेश शुल्क केवळ 200 रुपये ठेवण्यात आले आहे.
स्पर्धा पूर्णपणे Solo Dance स्वरूपाची असेल. प्रत्येक स्पर्धकाला कमाल तीन मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. भारतीय, लोकनृत्य, शास्त्रीय, देशभक्तीपर, फिल्मी किंवा इतर योग्य नृत्यप्रकार सादर करता येणार आहेत. मात्र गाणे बालकांना अनुरूप आणि सभ्य असणे बंधनकारक आहे.
स्पर्धकांनी आपला ऑडिओ ट्रॅक आयोजकांकडे आधी जमा करावा लागणार असून विषयाला अनुरूप, सुरक्षित व सभ्य वेशभूषा आवश्यक आहे. धोकादायक किंवा ज्वलनशील प्रॉप्सना स्पष्ट बंदी असेल. शाळेचे ओळखपत्रही बंधनकारक राहणार आहे.
ऑडिशन रविवार, 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन येथे होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7057029288, 8390795662, 9922359674, 9689227189
चिमुकल्यांनो, तयारीला लागा… कारण यंदा बुलढाण्यात मंचावर फक्त डान्स नाही, तर टॅलेंटचा धमाकाहोणार आहे!












Total Users : 3472339