बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुलढाणा शहरातील युवा संघटनाला अधिक धार देत मनोज अशोक चंदन यांच्यावर युवासेना शहरप्रमुखपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
पक्षाचे सक्रिय शिवसैनिक म्हणून सातत्याने कार्यरत असलेल्या चंदन यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. आता शहरातील युवकांना पक्षाशी जोडणे, युवासेनेचे जाळे मजबूत करणे आणि संघटनात्मक बांधणीला वेग देण्याचे मोठे आव्हान त्यांच्या खांद्यावर असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना अधिक आक्रमकपणे मैदानात उतरविण्याचा निर्धार चंदन यांनी व्यक्त केला आहे












Total Users : 3473435