spot_img
spot_img

उद्या मेहकरमध्ये होणार मोठं काहीतरी! ‘लोकनायक’ किशोर गारोळेंच्या वाढदिवशी उलगडणार २ कोटींचं ‘सरप्राईज’!

मेहकर (हॅलो बुलढाणा) शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे युवा व लोकप्रिय नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, उद्या दि. ८ सप्टेंबर रोजी शहरात धार्मिक, सामाजिक आणि विकासाभिमुख कार्यक्रमांचा अक्षरशः धडाका पाहायला मिळणार आहे. केवळ हारतुरे आणि शुभेच्छांपुरता वाढदिवस मर्यादित न ठेवता तब्बल २ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मेहकर शहरातील नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे आणि विकासासाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे ‘लोकनायक’ किशोर गारोळे यांचा वाढदिवस यंदा जनसेवेचा उत्सव ठरणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता श्री सारंगधर बालाजी मंदिरात अभिषेकाने होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता बालाजी मंदिर रोडवरील तब्बल २ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या विकासाला आणखी वेग मिळणार आहे.

सकाळी १० वाजता जानेफळ रोडवरील शिवशक्ती ट्रॅक्टर शोरूम येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. युवक, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यानंतर सकाळी ११ वाजता मेहकर नगरपरिषद कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने नगराध्यक्ष किशोर गारोळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

एकीकडे श्रद्धेचा अभिषेक, दुसरीकडे रक्तदानातून माणुसकीची सेवा आणि त्याचवेळी २ कोटींच्या कामांतून विकासाचा दमदार संकल्प अशा त्रिवेणी संगमामुळे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांचा वाढदिवस मेहकरच्या विकासपर्वातील आणखी एक लक्षवेधी दिवस ठरणार आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!