गोतमारा (हॅलो बुलढाणा/विश्वास वाघ) मोताळा तालुक्यातील गोतमारा येथे दुष्काळाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आगीने हिरावला! गोतमारा शिवारातील गट क्रमांक ४८ मधील विष्णू रामभाऊ कांडेलकर यांच्या तीन एकर बागायती शेतातील सोयाबीनची गंजी कोणीतरी पेटवून दिल्याचा त्यांचा आरोप आहे. आज दिनांक 24/10/2026 ला सायंकाळी पाच वाजता शेतातून घरी परतल्यानंतर ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. अंदाजे ३५ क्विंटल सोयाबीनसह ताडपत्री व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याने आता जगायचे कसे? घटनेची तातडीने चौकशी करून सत्य उघड करा; नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत द्या! कष्टाच्या राखेचा हिशेब कोण देणार?





Total Users : 3657767