spot_img
spot_img

अवैध रेतीमाफियांना एलसीबीचा दणका! टिप्पर व 6 ब्रासरेतीसह 60,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त;दोन आरोपींवर गुन्हा दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली हद्दीतील मलगी फाटा परिसरातून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून टिप्परसह 6 ब्रास रेती असा एकूण 60,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,या कारवाईमुळे अवैध रेतीमाफीयांचे धाबे दणाणले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज (रेती) ची चोरटी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी रेतीमाफियांच्या मुसक्या आवळण्याचे आदेशित केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके कार्यवाहीसाठी रवाना केली होती. दरम्यान चिखली पोलीस ठाणे हद्दीत मलगी फाटा परिसरातून रेतीची चोरटीवाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने एलसीबी पथक घटनास्थळी सापळा लावून बसले होते.आरोपी टिप्परच्या सहाय्याने अवैधपणे रेतीची चोरटी वाहतूक करीत  असताना ग्राम मलगी फाट्यावर मध्यरात्री सापळा रचून रोड नाकाबंदी केली. आरोपी संदिप लिंबाजी देढे वय 29 वर्षे, रा. देऊळगांव मही, ता. देऊळगांव राजा,पवन देविदास मुरकुट वय 27 वर्षे, रा. डोरव्ही, ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा यांच्या ताब्यातील टिप्परची झाडाझडती घेतली असता, विना परवाना 6 ब्रास रेती आढळून आली. टाटा कंपनीचे  30,00,000 रुपये किमतीचे टिप्पर क्र. MH-28 BB-7556 30,00,000 तसेच 30,000 रुपये किमतीची 6 ब्रास रेती असा एकूण 60,30,000 रुरुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुध्द पो.स्टे. चिखली येथे कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता, सह कलम 21 (1), 21 (2) गौण खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. चिखली यांचे कडून करण्यात येत आहे. ही कारवाई श निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर अमोल गायकवाड- अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा, पियुष जगताप – अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि हेमंत ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्या नेतृत्वात सपोनि. सुनिल इंगळे, पोहेकॉ. अनुपकुमार मेहेर, पोकॉ. विक्रांत इंगळे, सतीश नाटेकर, चापोकॉ. निवृत्ती पुंड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या पथकाने केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!