spot_img
spot_img

पीएम फंड ठरला 49 रुग्णांसाठी संजीवनी! तब्बल 1 कोटी 20 लाख 66 हजारांचे अर्थसहाय्य! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालया मार्फत करण्यात आला पाठपुरावा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील 49 रुग्णांना 1 कोटी 20 लाख 66 हजार रुपयांचा आर्थिक मदत निधी आरोग्य उपचारासाठी देण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून या संदर्भात पाठपूरावा करण्यात आला होता.

असाध्य उपचारासाठी रुग्णांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत सन 2024 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत रुग्णांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रताप राव जाधव यांच्या खासदार सुविधा केंद्र आणि वैद्यकिय मदत कक्षाकडे ह्दशस्त्रक्रिया, मुत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग उपचारासाठी मदत मागण्यात आली होती. या रुग्णांच्या उपचाराकरीता प्रधानमंत्री राष्ट्रीय निधी मिळण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असुन 31 ऑगस्ट 2026 पर्यंत दाखल करण्यात आलेल्या 73 पैकी 49 रुग्णांना पी.एम. रिलीफ फंड अंतर्गत 1 कोटी 20 लाख 66 हजार रुपयाची आर्थिक मदत संबंधित दवाखान्यामध्ये उपचाराकरीता वर्ग करण्यात आली आहे. तर 21 रुग्णांचे प्रकरणे प्रक्रियेत आहेत. तर केवळ 3 प्रकरणे रद्द झाले आहे.

पंतप्रधान रिलीफ फंड योजनेअंतर्गत बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील रुग्णांना अर्थ सहाय्य उपलब्ध रुग्णांना जीवदान देण्याचे काम करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाच्या वतीने रुग्णांना पी.एम.रिलीफ फंड मिळवून देण्यासाठी मदत केल्या जात आहे त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील नागरिंकाना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!