बुलढाणा (हॅलो बुलढाणा न्यूज) आरोग्यसेवा महाग होत असताना साखळी बुद्रुकमध्ये मात्र ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला! गावातील बालाजी मंदिरात १५ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत आणि समाधान बालरुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर, बुलढाणा यांच्या संयुक्त समन्वयातून भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी, उपचारासह औषधांचेही मोफत वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे बुलढाण्यातील आठ तज्ज्ञ डॉक्टरांनी थेट गावात पोहोचून आरोग्यसेवेचा आदर्श घालून दिला!
यामध्ये मेडिसीनतज्ज्ञ डॉ. आशिष लोखंडे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल जयस्वाल, सर्जन डॉ. अभिलाष माळी, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्रज्वल आंबेकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ सुरडकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनिषा कानडे, दंतरोगतज्ज्ञ डॉ. मयुरी आंबेकर आणि मधुमेहतज्ज्ञ डॉ. मंगेश लोखंडे यांनी सेवा दिली.
यावेळी सरपंच सौ. भगतताई, माजी सरपंच सुरेश चौधरी, माजी सरपंच विजयाताई कोळसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते






Total Users : 3638615